छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीर कार्यक्रम संपन्न

छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीर कार्यक्रम संपन्न

भंडारा, दि. 17 मे : भंडारा व पवनी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था व शिकवणी वर्ग मधील तरुण मुलांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्याकरीता दिनांक 16 मे 2023 रोजी जे. एम. पटेल महाविद्यालय, राजगोपालाचारी वार्ड, भंडारा येथे छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आले.

मेळाव्याचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जे. एम. पटेल महाविद्यालय डॉ. विकास ढोमणे, विशेष अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी हे होते. मार्गदर्शन सत्रामध्ये प्रमुख व्याख्याता म्हणुन प्राचार्य शा. तंत्रनिकेतन साकोली संदिप लांभाडे, एम. आय. टी. महाविद्यालय शाहापुर शाहिद अख्तर शेख, प्राचार्य अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी, वरठी डॉ. सचिन लोहे, मानसोपचार तज्ञ डॉ. रत्नाकर बांडेबुचे, श्रीमती अपर्णा (ताम्हणकर) कुर्तकोटी व्यक्तिमत्व विकास व कलमापन चाचणी तज्ञ भंडारा यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमामध्ये १०वी, १२ वी नंतर काय? भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी, नविन तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण व रोजगाराची संधी इत्यादीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन शिल्पनिदेशक सिमा नंदनवार आणि चक्रधर पाखमोडे तसेच प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य शा. औ. प्र. संस्था व्हि. एम. लाकडे, तर आभारप्रदर्शन सहा. आयुक्त, जि. कौ. वि. रो. व उद्यो. मार्गदर्शन केंद्र सुधाकर झलके यांनी केले.