जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा आढावा

 

चंद्रपूर, दि. 12: जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली.

 

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रभारी पोलीस उपअधीक्षक शिल्पा भरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजोग मेंढे, कार्यकारी अभियंता श्री. काळे, चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे कार्यकारी अभियंता प्रकाश गायकवाड, जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, जिल्हा जलसंधारण विभागाचे श्री. कालकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री.गौडा म्हणाले, शासकीय कर्तव्य पार पाडताना कामात विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारींची व गाऱ्हाण्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. सर्व प्रकरणे समितीपुढे ठेवावीत. तक्रारीचे प्रलंबित प्रकरणांवर तत्पर कार्यवाही करावी. जेणेकरून, प्रशासकीय कार्यपद्धती पारदर्शक राहील. शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार,गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्यास अशा अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय सेवेतील त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात त्वरीत व दंडात्मक कार्यवाही करून विभागीय चौकशीची कारवाई करावी. तसेच अशासकीय सदस्यांबाबत नियुक्तीची कार्यवाही करावी. तसेच लाचलुचपत अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.