पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र करिता निवड झाल्याबाबत.

१ मे महाराष्ट्रदिनी जिल्हयातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र करिता निवड झाल्याबाबत.

 

चंद्रपुर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उत्तम कामगिरीबद्दल उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राकरिता १) श्रीमती राधिका सुनिल फडके पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) चंद्रपुर २) सफौ. ५६३ चरणदास कुसन दाजगाये, जिल्हा विशेष शाखा चंद्रपुर ३) सफौ. १४६२ घनश्याम हावसुजी गुरनुले, पो.स्टे. माजरी ४) सफौ. २२८४ चंद्रकांत श्रीहरी पेंद्दीलवार, नक्षल विरोधी अभियान पथक, चंद्रपुर ५) पोहवा. ३५७ अरुण लक्ष्मण हटवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपुर ६) पोहवा. १७७३ राजेश केशवराव वऱ्हाडे, पो.स्टे. वरोरा. ७) पोहवा. १८६१ लायक महादेव ढाले, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चंद्रपुर. ८) पोहवा.८३७ इंद्रपाल सुकराम गोंगले पो.स्टे. घुग्घुस ९) चापोहवा. २२६७ अशोक नामदेवराव गर्गेलवार पो.स्टे. पडोली १०) नापोअं. २९८२ पुरुषोत्तम कैलास चिकाटे. पो.स्टे. रामनगर ११) नापोअं. ४४२ प्रशांत ताराचंद लारोकर, पो.स्टे. सायबर चंद्रपुर १२) पोअं. २५१४ प्रविण चंदु रामटेके, पो.स्टे. वरोरा यांची मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन निवड झाल्याबाबत मा. रविंद्रसिंग परदेशी, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर व मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा गौरव करण्यात आला.

सदर पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह / सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र महाराष्ट्र दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक ०१ मे, २०२३ रोजी मा. पालकमंत्री यांचे हस्ते प्रदान करण्यात येत आहे.