महीलेवर पेट्रोल टाकून स्वताला गळफास लावून केली आत्महत्या

महीलेवर पेट्रोल टाकून स्वताला गळफास लावून केली आत्महत्या

मुल :- महीलेवर पेट्रोल टाकून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी मूल मध्ये घडली आहे.या घटनेमुळे मूल मध्ये खळबळ उडाली आहे.गळफास लावून आत्महत्या करणा-या मृतकाचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे वय 45 रा.मूल वार्ड क्रं.11 असे आहे .शेजारी राहणा-या विवाहीत असलेल्या मुलीशी मृतकाचे प्रेमसंबध असल्याचे चर्चा आहे .त्यामुळे मृतकाच्या घरी नवरा बायको मध्ये नेहमी भांडणे व्हायची असेही बोलले जात आहे . सोमवारी दुपारी तणावामध्ये असताना बंडू निमगडे यांने एका बाटलीमध्ये पेेट्रोल आणून  महीलेच्या घरी जावून तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. तिला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच तणावामध्ये असताना निमगडे यांने वार्ड क्र.11 मधील राहत्या घरी येवून गळफास घेवून आत्महत्या केली.ही घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली आहे. पेट्रोल टाकून जखमी झालेल्या महिलेला मूल मध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.दरम्यान,घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी भेट दिली.जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याने मृतक बंडू निमगडे यांच्या विरूदध 307 चा गुन्हा दाखल झाला असून आत्महत्या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी  मार्गदर्शनाखाली मुल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकाअर्जुन इंगळे व प्रभारी ठाणेदार बन्सोड हे करीत आहेत.