पोलीस पाटील पदभरती केंद्र परिसरात कलम 144 लागू

 पोलीस पाटील पदभरती केंद्र परिसरात कलम 144 लागू

 

भंडारा, : साकोली उपविभागातील पोलीस पाटील पदभरती-2023 करिता 23 एप्रिल 2023 रोजी नंदलाल पाटील कापगते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृष्णमुरारी कटकवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल, साकोली येथे परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

या परीक्षा केंद्रावर 22 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत 200 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली असून कोणत्याही खासगी वा सार्वजनिक जागेमध्ये खालील प्रमाणे कृती करण्यास प्रतिबंध करण्याकरीता आदेश निर्गमित केले आहेत.

 

परीक्षा केंद्रावर हत्यार बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे, भाषणे करणे, घोषणा करणे, परिसरात टेलिफोन बुथ, झेरॉक्स मशिन यांनी व्यवसाय करणे,परीक्षा ईमारतीत मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करण्यास मनाई राहील, असे उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी कळविले आहे.