विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव सादर करावे

विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी

जात वैधता प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव सादर करावे

 

भंडारा : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आरक्षीत जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. सन 2022-23 या सत्रामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकूण 2 हजार 148 प्ररकणे प्राप्त झाले असुन या कार्यालयाने 2 हजार 100 प्रकरणे निकाली काढले आहे. ईयत्ता 11 वी व 12 वी मधील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता अर्ज केला नसेल त्यांनी बार्टीच्या CCVIS / barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक शालेय व महसुली पुरावे स्कॅन करून हार्डकॉपी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाला सादर करावे.

 

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागासवर्गीय उमेदवाराकडुन 803 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी 403 उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सद्या समितीस्तरावर 400 अर्ज त्रुटी अभावी प्रलंबित आहे. सर्व निवडूण आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी कार्यालयामध्ये येवून त्रुटीची पुर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.