Nagpur I नागपुरातील कोविड रुग्णांना केवळ एका फोन कॉल वर मिळत आहे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन…मनपाने उभारली नवी व्यवस्था..

नागपुरातील कोविड रुग्णांना केवळ एका फोन कॉल वर मिळत आहे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन…मनपाने उभारली नवी व्यवस्था..

नागपूरातील सर्व कोविड रुग्णांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजनसह आवश्यक इंजेक्शन आणि औषध उपचार मिळावे यासाठी आता नागपुर महापालिकेत विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे । या नियंत्रण कक्षाचा माध्यमातून आता कोरोना रुग्णांना केवळ एका फोन वर शासकीय, खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे । दररोज मनपा नियंत्रण कक्षाला 300 ते 350 कोरोना रुग्णांचे कॉल केवळ बेड उपलब्ध करून घ्यावा यासाठी येत असून नियंत्रण कक्षातील कर्मचारी, डॉक्टर त्यांची आस्थेने विचारपूस करून ,त्यांचा प्रकृतीची माहिती घेऊन त्यांना ऍम्ब्युलंस ने रुग्णालयात दाखल करण्यास मदत करीत आहे । नागपूरात अनेक रुग्णालयात बेड असतांनाही रुग्णाला बेड नसल्याचे सांगण्यात येत होते । तसेच गंभीर रुग्ण नसतांनाही श्रीमंत नागरिक विनाकारण रुग्णालयातील बेड अडवून ठेवत होते । मात्र आता मनपाने नियंत्रण कक्षाचा ।माध्यमातून च रुग्ण भरती केले जाईल असेल आदेश काढले असून खाजगी किंवा सरकारी रुग्णालय केवळ अति गंभीर रुग्णच विनापरवानगी दाखल करून घेतील, नियंत्रण कक्षाचा माध्यमातून विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये रेमडीसिवीर, ऑक्सीजन पुरवठयावर देखरेख ठेवन्यात येत आहे । हे कंट्रोल रुम २४ तास सुरु ठेवण्यात आले असून कंट्रोल रुममधून बेड अलॉट झाल्यानंतरच रुग्णाला दाखल केले जात आहे. संबंधीत हॉस्पीटलला देखील याची पूर्वसूचना दिली जात आहे । या व्यवस्थेमुळे आता रुग्ण किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्यांना बेड,ऑक्सिजन,इंजेकशन करीता पायपीट करावी लागणार नाही, शिवाय एका कॉल वर रुग्ण रुग्णालयात भरती होत आहे । या नव्या व्यवस्थेने नागपुरातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले आहे