आठ तलाठ्यांची मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती

आठ तलाठ्यांची मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती

 

भंडारा दि.12 : जिल्ह्यातील आठ तलाठ्यांना मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नतीचा आदेश आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमीत करण्यात आला. यामध्ये लाखनी तालुक्यातील 3, साकोली तालुक्यातील 2, मोहाडी तालुक्यातील 1 व पवनी तालुक्यातील 2 तलाठ्यांना पदोन्नती देण्यात आली.

 

मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती झालेल्यांमध्ये लाखनी तालुक्यातील ए.एल.पारधी, व्ही.एम.धावडे, पि.एन.कौरवार, साकोली तालुक्यातील शेखर ठाकरे, आर.सी.पटले, मोहाडी तालुक्यातील एस.एस.आहाके तर पवनी तालुक्यातील एस.एस.उपासे, एम.टी.जुमळे यांना पदोन्नती देण्यात आली.