अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना टॅबव्दारे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना टॅबव्दारे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

भंडारा, दि.05:- आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे (टीआरटीआय) या शासकीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात कोविड 19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सध्या सर्व शाळा, महाविद्यालय प्रशिक्षण व शिक्षण संस्थेतील सुरू असलेले सर्व कामकाज स्थगित आहे. परंतू संघ व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रकाशित झालेल्या नोकरी विषयक जाहिरातीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सदर कालावधीत विविध परिक्षांचे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना टॅबव्दारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तरी माहिती पत्रक व अर्जाचा नमुना www.trti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन नमुद केलेल्या सर्व कागदपत्रासोबत अर्ज पूर्ण भरुन अर्जासोबत सर्व कागदपत्राची स्कॅन प्रत दिलेल्या विहित दिनांकापर्यंत trg.trti-mh@nic.in या ई-मेल वर पाठवावी व सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.