सुब्रोतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय फुटबॉल कप स्पर्धा

सुब्रोतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय फुटबॉल कप स्पर्धा

Ø सहभागी होण्यासाठी 15 जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 6 जुलै : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या वर्षी सुब्रोतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी स्पर्धेपूर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघानी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

प्रवेश अर्ज, नोंदणी शुल्क 500 रुपये व प्रति संघ 300 रुपये याप्रमाणे शुल्क भरून दि. 15 जुलै 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे प्रवेश अर्ज सादर करावा. त्यानंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा स्वीकार केल्या जाणार नाही. सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल या खेळाकरिता 14 वर्षे वयोगटातील सबज्युनियर मुले 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या असावा. तसेच 17 वर्ष वयोगटातील मुले-मुली 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

तरी, जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपले प्रवेश अर्ज विहित मुदतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.