आमगांव रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट. खासदार अशोकजी नेते

आमगांव रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट. खासदार अशोकजी नेते

अमृत भारत रेल्वे स्टेशन ता.आमगांव येथे ७.१७ करोड रूपये मंजूर..

आमगांव:-अमृत भारत स्टेशन स्कीम योजना अंतर्गत देशभरात मान.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा ५५४ रेल्वे स्टेशन चा पुर्णविकास व १५०० रोड ओवर ब्रिज / अंडरपास उद्घाटन मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी द्वारा व्हिडिओ कॉम्प्रेसिंग च्या माध्यमातुन संपन्न झाले.

खासदार अशोक नेते यांनी सतत नेहमी सातत्याने रेल्वे संबंधित पाठपुराव्याने प्रयत्नाला यश येऊन आज दि.२६ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते व्हिडिओ कॉम्प्रेसिंग च्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजनेचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.

अमृत भारत रेल्वे स्टेशनचा खासदार अशोकजी नेते यांनी केलेल्या प्रयत्नाने गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रातील ता.आमगांव येथे अमृत भारत रेल्वे स्टेशन समाविष्ट करण्यात आल्याने अमृत भारत स्टेशन स्कीम योजना अंतर्गत आमगांव या रेल्वे स्टेशन चा पुर्णविकासाचा उद्घाटन मान.खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत आमगांव या रेल्वे स्टेशन चा उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना मी रेल्वे संबंधित नेहमी सतत सातत्याने अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्या बरोबरच अमृत भारत स्टेशन स्कीम योजना मध्ये आमगांव या रेल्वे स्थानकांसाठी ७.१७ करोड रूपये मंजूर करून घेतले यामुळे
आमगांव रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट होऊन नागरिकांना यांचा निश्चितच फायदा होईल

अमृत भारत कार्यक्रमासाठी आदरणीय पंतप्रधानांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली
अमृत ​​भारत स्थानक योजनेद्वारे रेल्वे विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशन पोहोचणे,वेटिंग, हॉल,मोफत वाय-फाय, यासारख्या नागरिकांच्या आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत. आमगांव या स्टेशनचा पुनर्विकास खर्च: ७.१७ कोटी रुपये मंजूर झाले याचा फायदा आमगांव तालुक्यातील नागरिकांना होईल. असे प्रतिपादन खासदार अशोकजी ‌नेते यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक ‌नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. येसुलालजी उपराडे, माजी आमदार केशवभाऊ मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयजी शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य छब्बु ऊईके,आमगांव भाजपा तालुकाध्यक्ष राजु पटले, शहराध्यक्ष पिंटु अग्रवाल, जिल्हा सचिव नरेंद्र भाजपेई,यशवंत मानकर, राकेश शेंडे, अंजु ताई बिसेन, ग्रामीन अध्यक्ष महिला मोर्चा सुषमा भुजाळे, शहर अध्यक्ष महिला मोर्चा अनिरुद्ध शेडे, महामंत्री नगर महामंत्री मनोज सोमवंसी, नगर महामंत्री धनलाल मेंडे,परसराम फुंडे,मुन्ना बिसेन तसेच हजारोंच्या मोठया संख्येने नागरिक व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.