जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 

आज दिनांक 17/03/2023 ला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मार्कंडा देव या ठिकाणी करण्यात आले होते. त्यामध्ये जनहित ग्रामीण विकास बहुउदेशिय संस्था येनापुर तर्फे स्त्रि भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचाार या विषयावर आधारित कलापथक द्वारा पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला उपस्थित मा. आर.आर. पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, मा. प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली, मा. वर्षा मनवर अध्यक्षा बाल कल्याण समिती गडचिरोली, मा. संजय नागटिळक तहसिलदार तहसिल कार्यालय चामोर्शी, मा. पाटील सर सवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शि, मा. राजेश खांडवे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चामॉर्षी, सरपंच संगीता मंगरे तसेच मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे सचिव मा. मृत्युंजय गायकवाड, वन स्टॉप सेंटर चे केंद्र प्रशासक संगीता वरघंटिवार, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, मोनिका वासनिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला अगंनवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाचे प्रतिनिधी तसेच गावातील महिला जवळपास 100 ते 150 महिलांनी सदर कार्यक्रमाला सहभाग घेतला होता.