माविमचा 48 वा वर्धापनदिन उत्साहात

माविमचा 48 वा वर्धापनदिन उत्साहात

 

भंडारा दि. 24 : महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 24 फेब्रुवारी 1975 रोजी झाली. तेव्हापासून माविम महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात काम करीत आहे. आज दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी माविमचा 48 वा वर्धापनदिन लोकसंचालित साधन केंद्रांच्या कार्यालयात एकाच वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरे करण्यात आले. ग्रामीण भागात महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा व कुटुंबांच्या विकासासाठी हातभार लावले आहे. महिलांच्या सोबतीने माविमने लोकसंस्था निर्माण करून महिलांच्या आर्थिक विकासाला उद्योगाची जोड देत दिनशासारख्या मोठ्या कंपनीसोबत काम करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात एकूण 88 दुध संकलन केंद्र सुरू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात दुध संकलित करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात रेशीम कापड, साडी, फ्रेम यांसारख्या वस्तू आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोहोचविल्या आहेत. माविम स्थापित लोकसंचालित साधन केंद्राच्या कार्यालयात बचत गटातील महिलांच्या उपस्थितीत माविमचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आॅनलाईन गुगल मिटद्वारे माविम मुंबईच्या कार्यक्रम व्यवस्थापक रुपा मेस्त्री, विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी राजू इंगळे, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, लेखाधिकारी मुकुंद देशकर, सल्लागार भावना डोंगरे, मनोज केवट उपस्थित होते. याप्रसंगी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा, सचिव, कार्यकारी सदस्य, व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल व सहयोगीनी उपस्थित होत्या.

 

भंडारा म्हणजे पाहुण्याचा स्वागत करणारा जिल्हा. भंडारा जिल्ह्याचे रेशीम कापड, साडी, स्टोल, फ्रेम आम्ही देश व विदेशात पोहचवु शकलो. तसेच माविमचा प्रत्येक कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत ह्या भेट वस्तु देऊन करतो. जिल्ह्यात दुध व्यवसाय अधिक प्रगत केला गेला असुन दिनशा कंपनीची ची साथ मिळत आहे यामुळे महिला बचत गटाच्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढताना दिसत आहेत.

 

रुपा मेस्री

 

कार्यक्रम व्यवस्थापक

 

माविम मुंबई