जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

 

भंडारा दि.19 : महसूल विभागांतर्गत भंडारा जिल्हा सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा-2023 चे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते पोलीस मैदान येथील चैतन्य ग्राउंड येथे उद्घाटन झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, सचिन डोंगरे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, साकोली, तुमसर या चार संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते.

महसूल विभागा अंतर्गत जिल्ह्यात सांस्कृतीक व क्रीडा स्पर्धांचे 19 व 20 जानेवारी रोजी आयोजन होत आहे. या स्पर्धांमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक, नृत्य, नाट्य व इतर रंगारंग कार्यक्रमाबरोबरच क्रिकेट, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुध्दीबळ, टेबलटेनिस, कॅरम, बॅडमिंटन, जलतरण, मैदानी आणि थ्रोबॉल अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचेही आयोजन होणार आहे.