केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023

Ø 6 ते 15 जून कालावधीत ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज आमंत्रित

 

चंद्रपूर, दि. 6: राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने माहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे 6 ते 15 जून या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.