शेतीवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

शेतीवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Ø  युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.9 जुलै :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता दि. 13 जुलै  ते 26 जुलै2021  या कालावधीमध्ये ऑनलाईन शेतीवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सदर कार्यशाळेत ऑनलाईन शेतीवर आधारीत विविध उद्योगसंधी, अन्न प्रक्रियावर आधारीत उद्योगसंधी, डिजीटल मार्केटिंग, ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्धव्यवसाय व  दुग्धप्रक्रिया उद्योगातील उद्योगसंधी, फळ प्रक्रियातील उद्योगसंधी , पशुसंवर्धवर आधारीत उद्योगसंधी, उद्योजकता व उद्योजकाचे गूण, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण, संकलन व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्तता व समस्या निराकरण, संघटनाचे प्रकार, शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादन निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने, नाहकरत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, खेळते भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, ऑनलाईन कर्जप्रक्रीया व कृती आराखडा तयार करणे इत्यादी विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या वेबसाईटवर 12 जुलै 2021  पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी, के व्ही.राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व  कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे,  मो. न. 9011667717, लक्ष्मी खोब्रागडे मो.न. 930957445 या क्रमांकावर संपर्क साधावा. इच्छुक युवक-युवतींनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे, प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड यांनी केले आहे.