उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

 

भंडारा दि. 8 :महाराष्ट्रातील सुशिक्षीत तरुणवर्ग हा मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून सद्य:परिस्थितीत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणे दूरापास्त झाल्याचे दिसून येते. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांना भविष्यातील अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे याकरीता सुशिक्षीत तरुण वर्गास उद्योगाकडे वळविणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरीता दि. 9 फेब्रुवारी, 2023 रोजी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र शिवणकर, व जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक ताईतकर, यांचे उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

तरी भंडारा जिल्ह्यातील सुशिक्षीत तरुण वर्गाने उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, भंडारा येथील सभागृहात दि. 9 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.30 वा.जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.