उद्योग व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन

उद्योग व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन

 

Ø जिल्ह्यातील उद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत राज्यात उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकूल वातावरणात चालना मिळण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूरतर्फे 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात उद्योग संचालनालय मुंबई, मैत्री कक्षामार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेस व्यायसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. आयटी पातळीवर तसेच नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणाविषयी, शासनाने राबविलेल्या विविध सुधारणांविषयी आणि वापरकर्त्याकडून अभिप्राय मागण्यासाठी मैत्री कक्ष मुंबई येथे कार्यरत सल्लागारांची टीम अनिरबन दत्ता गुप्ता व रिना रोशन मिरांडा “इज ऑफ डुईंग बिजनेस” सुधारणाबद्दल सादरीकरण करणार असून त्यानंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रमाचे आयोजन होईल. तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध धोरणांवर आपले अभिप्राय यावर देखील चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, सनदी लेखापाल तसेच उद्योग व्यवसायाशी संबंधित सर्व शासकीय विभागाचे विभाग प्रमुख तसेच जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

तरी, जिल्ह्यातील उद्योजकांना सदर कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी 19 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृह येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.