13 जानेवारी 2023 पर्यंत भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

13 जानेवारी 2023 पर्यंत भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

 

भंडारा, दि. 29 : 19 डिसेंबर पासुन नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झालेले आहेत. त्या निमीत्याने बऱ्याच संघटना भंडारा येथे मोर्च्याचे आयोजन करीत असतात किंवा नागपूर येथे जात असतात. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस व 1 जानेवारी नविन वर्षाचे आगमनानिमीत्य जलाशयाचे ठिकाणी, जंगल भागात तसेच निर्जन स्थळी लोक पाटर्याचे आयोजन करीत असतात व खेडोपाडी जलसाचे आयोजन करीत असतात. त्याचप्रमाणे रात्रीचे वेळी मनोरंजनाकरीता नाटक, तमाशे, आर्केस्ट्रा, लावण्या अशा सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. राज्यशासन अधिकारी व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना बहाल करावी, पावसाळी हंगामातील भात पिक हातात आलेले असुन धान्य पिकाची सरकारकडून लवकरात लवकर खरेदी करण्यात यावी. धानाला बोनस देण्यात यावा. पुढे येणाऱ्या खरीप शेतीकरीता शेतकऱ्यांना बि-बियाने, खते, रासायनिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावेत व त्यांचा पुरवठा नियमित करावा, पुर्नवसन, वाढती महागाई तसेच विविध मागण्यांना घेऊन निषेधार्थ राजकीय पुढारी मजुर वर्ग व शेतकरी वर्गाला हाताशी धरुन धरणे, मोर्चे, आंदालने, निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 30 डिसेंबर 2022 ते 13 जानेवारी 2023 पर्यंत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.