राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन 27 डिसेंबर 2022 रोजी

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन 27 डिसेंबर 2022 रोजी

 

गडचिरोली, दि.23: शासन निर्णयान्वये दिनांक 24 डिसेंबर हा दिवस “ राष्ट्रीय ग्राहक दिवस’’ म्हणून साजरा करण्यात येतो, त्याअनुषंगाने दिनांक 24 डिसेंबर 2022 शनिवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे “ राष्ट्रीय ग्राहक दिनाचा’’ कार्यक्रम दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता गोंडवाना सभागृह,तहसिल कार्यालय परिसर गडचिरोली येथे जिल्हास्तरीय “ राष्ट्रीय ग्राहक दिनाचे ’ आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रर्दशन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.