धान व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीकरिता 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

धान व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीकरिता 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर दि. 3 : खरीप पणन हंगाम २०२२ – २३ मधील शासकिय आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता एन.इ.एम.एल. पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 7 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राना धान खरेदी सुरू करणेसाठी शेतकरी नोंदणी करताना हंगाम २०२२ – २३ पासुन ज्या शेतक-याचा ७/१२ आहे, त्याच शेतक-याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही. त्यामुळे शेतक-यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.