पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली, दि.27: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02 मे 2023 रोजी कृषी महाविद्यालय, सभागृह गडचिरोली येथे ठिक 10.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती, विकास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास, हे महामंडळे उपस्थित असणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ घेण्यासाठी‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता असलेले ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि.02 मे 2023 रोजी कृषी महाविद्यालय, सभागृह, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे.