स्वावलंबी नगर येथे वृक्षारोपण योगनृत्य परीवार स्वावलंबी नगरचा उपक्रम

स्वावलंबी नगर येथे वृक्षारोपण योगनृत्य परीवार स्वावलंबी नगरचा उपक्रम

चंद्रपूर २८ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेअंतर्गत योगनृत्य परीवार स्वावलंबी नगर यांनी भारतीय संविधान दिनी वृक्षारोपण केले.

या कार्यक्रमास आयुक्त विपिन पालीवाल, प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तू बनविणारे डॉ. पालीवाल, शहराचे पूर्व उपमहापौर श्री राहुल भाऊ पावडे आणि योग नृत्य परिवाराचे जनक गोपालजी मुंदडा प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. पालीवाल यांनी भारतीय संविधानात असलेल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये पर्यावरणाचे रक्षण आपण का करायला हवे याबद्दल माहिती सांगितली. आयुक्त विपीन पालीवाल यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम सांगितला. राहुल पावडे यांनी स्वावलंबी नगर टीमला स्वच्छ्ता अभियानात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले. गोपाळ मुंदडा यांनी योगनृत्य परीवार स्वच्छता लीगमधे पूर्णपणे सहभागी असून मोठ्या पातळीवर स्वच्छ्ता चालू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सूरवात योगनऋत्याची शाखा प्रमुख सुरेश घोडके यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. त्यांनतर पाहुण्यांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. मंगेश खोब्रागडे यांचे नेतृत्वात नगिनाबाग वॉर्ड मधे पर्यावरण आणि स्वच्छ्तेबद्दल जनजागरण रॅली काढण्यात आली. कल्पेश भासरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व श्री धीरेंद्रकुमार मिश्रा यांनी आभार प्रदर्शन केले.

सदर कार्यक्रमास २०० नागरीकांचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कांबळे,प्रकाश कांबळे, संध्या उराडे,पूजा पवार, जयश्री नक्षिने, शारदा मुरास्कर, आकाश घोडमरे, संगीता सिरसगार, धनंजय तावडे, शरद मानक यांनी परीश्रम घेतले.