लाखांदुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता 28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार- तहसिलदार वैभव पवार

लाखांदुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता 28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार- तहसिलदार वैभव पवार

भंडारा, दि. 21 : लाखांदुर तालुक्यातील माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या तिरखुरी, पालेपेंढरी, पाचगांव, सोनेगांव/घोडे, मासळ, पेंढरी, हरदोली, पाऊलदवना, तई (बुज), मांढळ, खोलमारा, जैतपूर, चिकना, मुरमाडी, तावशी, साखरा, दिघोरी(मोठी), बारव्हा, बोथली, धर्मापुरी, मानेगांव/बोर, भागडी, परसोडी/नाग, पाऊणगांव, आथरी, आसोला, खैरी/घर, ढोलसर, सरांडी बुज, ओपारा, डोकेसरांडी, विरली (बुज), राजनी, विरली/खु, करांडला, ईटान, किरमटी, दोनाड, रोहणी, नांदेड, खैरणा, मोहरणा, कुडेगांव, गवराळा, खैरी/पट, डांबेविरली, विहीरगाव, दहेगांव, पिंपळगाव/को, मडेघाट, व चप्राड या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोग यांच्या कडून निवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वी्रेकारण्यात येणार आहे.

संबंधित ग्रामपंचायती मधील ज्या कोणत्याही उमेदवारास व नागरिकास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरीता राखून ठेवलेल्या जागेवर निवडणूक लढवायची आहे. अशा उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे अर्ज ऑनलाइन भरून आवश्यक दस्तऐवजासह तहसिल कार्यालय लाखांदुर येथील निवडणूक शाखेत सादर करावे, असे लाखांदुरचे तहसिलदार वैभव पवार यांनी कळविले आहे.