कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास मदतीबाबत सुचना

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास मदतीबाबत सुचना

चंद्रपूर दि.13 ऑक्टोबर : कोविड-19 या आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास, वारसदारास 50 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येणार असल्याचे शासनामार्फत कळविण्यात आले आहे.
परंतु, याकरीता अमलांत येणाऱ्या ऑनलाईन प्रक्रियेचा तपशील अद्याप अप्राप्त आहे. त्याबद्दलची माहिती शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ सूचित करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव संपत खलाटे यांनी कळविले आहे.