दिशा समितीची आज बैठक

दिशा समितीची आज बैठक

 

भंडारा दि. 27 : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक उद्या दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार सुनिल मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये नरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री पिक विमा योजना, राष्ट्रीय शिक्षा अभियान, मुद्रा योजना, डिजीटल इंडिया यासह एकूण 22 विषयांचा आढावा होणार आहे.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणांचे जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित असतील असे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विवेक बोंदरे यांनी कळविले आहे.