हंसराज अहीर गुजरातेत 2 दिवसांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर

हंसराज अहीर गुजरातेत 2 दिवसांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर

चंद्रपूर/यवतमाळ:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर 2 दिवसांच्या गुजरात प्रचार दौÚयावर असून ते राजकोट विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दि. 21 नोव्हेंबर रोजी हंसराज अहीर यांनी गुजरातला प्रस्थान केले असून 21 व 22 नोव्हेंबर पर्यंत ते या क्षेत्रात प्रचार, संघटनात्मक बांधणी, प्रमुख नेत्यांच्या बैठकी व मतदारांशी संपर्क साधणार आहेत. यापूर्वी पक्ष नेतृत्वाने त्यांचेवर उत्तर प्रदेश, गोवा राज्यातील अनेक मतदार क्षेत्रात प्रचाराची जबाबदारी सोपविली होती. बिहार राज्यामध्येही हंसराज अहीर यांनी आपल्या प्रवास दौÚयात भाजपा ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्यामध्येही प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली होती.