जात वैधता प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढण्याबाबतचे अभियान कार्यशाळा

सन 2022-23 या शैक्षणिक सत्रातील 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंडणगड पॅटर्न राबवून जात वैधता प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढण्याबाबतचे अभियान कार्यशाळा

 

गडचिरोली, दि.16: सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील राखीव प्रवर्गातील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढण्याकरीता जिल्हातील विज्ञान शाखेचे सर्व महाविद्यालयांचे प्राचार्याची मंडणगड पॅटन नुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढण्याचे नियोजन करण्याकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे आयोजन करुन महाविद्यालय स्तरावर स्थापन केलेल्या Equal Opportunity Center च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रांना लागणाऱ्या पुराव्यांची माहिती महाविद्यालयात प्रवेशीत सर्व विद्यार्थ्यांना देवून व त्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन सदर प्रस्ताव जमा करुन ते प्रस्ताव कॅम्पच्या माध्यमातून घेणेकरीता समिती कार्यालयास कळविण्याचे सुचना देण्यात आल्या.

तसेच महाविद्यालयांना प्रवर्गनिहाय 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची माहिती या कार्यालयास सादर करण्याकरीता सुचना दिले.

सदर सभेत सुरेश द. जाधव, अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) यांचे अध्यक्षते खाली देवसूदन ना. धारगावे, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, तसेच राजकुमार पा. निकम, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद, गडचिरोली व अमोल यावलीकर, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली सदर अधिकारी तसेच कार्यालयाचे इतर कर्मचारी कार्यशाळेत उपस्थित होते. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.