आझाद गार्डन योग नृत्य परिवारातर्फे समाधी वॉर्ड येथे स्वच्छता

आझाद गार्डन योग नृत्य परिवारातर्फे समाधी वॉर्ड येथे स्वच्छता

 

चंद्रपूर ७ ऑक्टोबर – चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत योग नृत्य आझाद गार्डन टीमद्वारे सहभागी होऊन गोविंद स्वामी मंदिर समाधी वॉर्ड येथे स्वच्छता करण्यात आली.

समाधी वार्ड येथे असलेले गोविंद स्वामी मंदिर हे गोंडकालिन पुरातन मंदिर आहे. मात्र दुर्लक्षित असल्याने या गोंडकालिन पुरातन मंदिराची अवस्था चांगली नाही. आझाद गार्डन योग नृत्य परिवाराच्या हे लक्षात येताच मंदिराचा कायापालट करण्याचे योगनृत्य परिवाराने ठरविले. गोपाल मुंदडा यांच्या मार्गदर्शनात मुग्धा खांडे यांनी आपली टीम घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. परिसरातील लोकांचाही मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन मंदिराचा स्लॅब गळत असल्याने टीम सदस्यांनी निधी गोळा करून लोकसहभागातुन मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा करावयाचे ठरविले आहे.

प्रकाश कवीश्वर, किरण अनंदांकर,अनिल अंदनकर, अ‍ॅड. पुराणकर, संजय गायकवाड,दुर्गोपुरोहित आणि समाधी वॉर्ड मधील इतर नागरिकांचा लोकसहभाग मोहीमेस मिळत आहे. स्वच्छतेची मोठी स्पर्धा घेण्यासाठी व स्वच्छता कार्यात सर्व सामाजिक संस्थांद्वारे लोकसहभाग वाढविण्याची संधी दिल्याबद्दल आझाद गार्डन योग नृत्य परिवारातर्फे चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे.