गडचिरोली : पर्यावरण संवर्धन आणि पौष्टिक चौरस आहारासाठी २०० व्यक्तीना फळ झाड व परसबाग बियाणे वितरण.

पर्यावरण संवर्धन आणि पौष्टिक चौरस आहारासाठी २०० व्यक्तीना फळ झाड व परसबाग बियाणे वितरण.

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, यांचा नाविन्य पूर्ण उपक्रम

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्हा

कुरखेडा:-
आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, यांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून विविध नाविन्य पूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. मागील दोन वर्षापासून कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था खोळंबलेली आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्ती आणि एकल महिला यांच्या कुटुंबावर झालेला आहे. या कुटुंबाची आजीविका अबाधित राहावी. कुटुंबांना पौष्टिक चौरस आहार मिळावा सोबतच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या संकल्पनेतून २०० दिव्यांग व्यक्ती आणि एकल महिलांना पेरू, सीताफळ. आवळा, फणस, लिंबू, या फळ फळझाडांचे आणि १० प्रकारच्या भाजीपाला पिकांचे सांदवाडीमध्ये लागवड करून आपल्याला आपल्याच घरच्या आणि आपणच वाढविलेल्या फळांचा आणि भाजीपाल्याचा आस्वाद घेता यावा. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” या स्पष्टोक्तीनुसार लोकांना फळ झाडाप्रती आशक्ती वाटावी, प्रत्येकाला वर्षातून एक तरी झाड लावण्याची आवड निर्माण व्हावी, शुद्ध हवा आणि शुद्ध फळ खायला मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने कुरखेडा, आरमोरी, वडसा तालुक्यातील खेडेगाव, बांधगाव, सोनेरांगी, आंधळी, चिखली, नान्ही, कसारी, मोहझरी, बोरी, देशपूर, कन्हाळगाव, खरमतटोला, पाठणवाडा, वडधा, गोठणगाव, डोंगरमेंढा, शंकरपूर, मौशी, चामोर्शी माल या गावातील २०० दिव्यांग व्यक्ती आणि एकल महिला यांना ‘’पर्यावरण संवर्धन आणि पौष्टिक चौरस आहारासाठी फळ झाड व परसबाग बियाणाचे वाटप करण्यात आले,
हा अफलातून उपक्रम संकल्पना राबविण्यासाठी लोकांना शुद्ध हवा, शुद्ध फळ आणि आरोग्यवर्धक शुद्ध आहार मिळण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वेगवगळ्या संकल्पना साकारणारे आणि दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी सदोदित कार्यरत असणारे संस्थेचे संस्थापक संयोजक डॉ. सतीश गोगुलवार, दिव्यांग व्यक्ती रोजगार प्रशिक्षण सेंटरचे व्यवस्थापक मुकेश शेंडे, दिव्यांग व्यक्तीचा आर्थिक पुनर्वसन कार्यक्रम समन्वयक मनोज मेश्राम तसेच आदिवासीची शाश्वत उपजीविका कार्यक्रम समन्वयक तन्मयभाऊ भोयर यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने हा उपक्रम पार पाडण्यात आला .
उपक्रमाच्या यशस्वितेकरिता दिव्यांग व्यक्तीचे अधिकार विषय समन्वयक संगिता तुमडे, क्षेत्र समन्वयक लक्षमण लंजे आणि महेश निकुरे, निशा जांभूळकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली .