गडचिरोली | सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

गडचिरोली | सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

गडचिरोली, दि.31: सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी, नायक तहसिलदार अमोल गव्हारे, जिल्हा नाझर आशीष सोरते, अ.का. दुधबळे,अ.का.बागमारे, भैसारे,मेश्राम आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

तसेच सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.