राष्ट्रीय एकता दौडचे स्पर्धा

राष्ट्रीय एकता दौडचे स्पर्धा

गडचिरोली, दि.31: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्याने दि. 31 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी 07.00 वाजता “राष्ट्रीय एकता दौड” (UNITY RUN)जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे पुरुष व महिला गटात अनुक्रमे 5 कि.मी. व 3 कि.मी. अंतराची दौड स्पर्धा स्थानिक इंदिरा गांधी चौक येथून आयोजीत करण्यात करण्यात आली.

सदर एकता दौड सुरु करण्या अगोदर “राष्ट्रीय एकता दिवस शपथ” खेळाडूंना देण्यात आली व नंतर राष्ट्रीय एकता दौड ला सुरुवात केली. एकता दौडचे उद्धाटन डॉ. मिलींद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. राष्ट्रीय एकता दौडमध्ये सुमारे 125 ते 130 मुले व मुली सहभागी झाले. सहभागी खेळाडूमध्ये लक्षवेध ॲकडमी, गडचिरोली, गडचिरोली जिल्हा ॲनेचर क्रीडा कराटे डो असोसिएशन, कल्पतरु ॲकडमी, गडचिरोली येथील प्रशिक्षणार्थी तसेच जिल्हा क्रीडा संकुलातील सराव करणारे अनेक खेळाडू, नागरीक यांचा समावेश होता. राष्ट्रीय एकता दौडचे प्रारंभ इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून सुरुवात होऊन आय.टी.आय. चौक व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दौड चे समाप्त करण्यात आली व नंतर जिल्हा क्रीडा संकुल गडचिरोली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन जयंती साजरी करण्यात आली. सर्व कार्यक्रम समाप्तीनंतर सहभागी खेळाडूंना खाऊ वाटप करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या मार्गदर्शनात श्री.एस.बी.बडकेलवार, क्रीडा मार्गदर्शक श्री. विशाल लोणारे, वरिष्ट लिपीक, श्री. महेंद्र रामटेके, श्री. सुनिल चंद्रे, श्री. कुणाल मानकर यांचे सहकार्य लाभले. तसेच स्काऊट आणि गाईड, गडचिरोली येथील श्री. विवेक कहाळे, निता आगलावे, प्रतिमा रामटेके, सुरपाम मॅडम व नेहरु युवा केंद्राचे श्री. कैलाश यर्लावार, श्री. लोकेश सोमनकर, श्री. अनुप कोहळे यांचेसुद्धा सहकार्य लाभले.

राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ श्री. प्रविण मुक्तावरन, सदस्य, गुरुदेव सेवा मंडळ, गडचिरोली यांनी दिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन तालुका क्रीडा संयोजक श्री. खुशाल मस्के यांनी केले.