अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन जप्त

अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन जप्त
◾ सिंदेवाही तहसील कार्यालयाची मोठी कारवाही.

सिंदेवाही :- तहसील कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या परिसरात सर्रास अवैध गौणखनिजाचे उत्खनन करुन शहरात वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून सिंदेवाही तहसील कार्यालय येथे लावण्यात आले असल्याने गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सिंदेवाही तालुका हा गौण खनिज साठी प्रसिद्ध असून येथे अनेक तस्कर महसूल विभागाला हुलकावणी देऊन गौण खनिजाची तस्करी करीत असतात.या तालुक्याला मागील सहा महिन्यात सहा तहसीलदार लाभले असल्याने कोणतेही अधिकारी गौण खनिज चोरी वर आळा घालू शकले नाही. दरम्यान बुधवारी दुपारी ४ वाजता अवैध्य मुरूमाचा ट्रॅक्टर नवरगाव रोड कडून येत असल्याचे माहिती महसूल विभागाला मिळताच सिंदेवाही चे नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी शहरातील शिवाजी चौक येथे सदर ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरची चौकशी केली असता ट्रॅक्टर मध्ये मुरूम असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनाचे क्रमांक -MH ३४, BF ३४५४ असून मुरूम वाहतूक करणारी ट्राली विना क्रमांकाची आहे.तसेच वाहन चालकाकडे गौण खणीजाची कसल्याही प्रकारचा वाहतूकीचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे वरील क्रमांकाचे ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे आणून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांचा मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी केली आहे. या कारवाईने सिंदेवाही तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव वृत्त लीहेपर्यंत कळू शकले नाही. मात्र शहरातील एका राजकीय पुढारी व्यक्तीचा असल्याचे बोलल्या जात आहे.