काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धिबळातील ‘प्यादे’! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा टोला

काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धिबळातील ‘प्यादे’! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा टोला

मुंबई

बुद्धीबळात ज्याप्रमाणे पटावरील राजाला वाचवण्याचे काम प्यादे करतात,त्याचप्रमाणे कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी, पडझड रोखण्यासाठी आणि विशेष म्हणजे पक्षाच्या युवराजांचे राजकीय कारकीर्द वाचण्यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड करण्यात आली असल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केला. खर्गे यांच्याकडे संघटन कौशल्य नाही. त्यांचा स्वभाव देखील मनमिळावू नाही.पक्षबांधणीसाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्याच नाहीत. शिवाय ते केवळ संसदेच्या सभागृहात उत्तम बोलू शकतात.पंरतु, भाषण कौशल्याअभावी सभा गाजवण्याचा वकुब त्यांच्याकडे नाही.त्यामुळे देशवासियांना कॉंग्रेसकडे आकर्षित करणे, लोकांचे प्रश्न सोडवणे शिवाय भाजपवर आवेगाने तुटून पडण्याचा गुण खर्गे यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत नाही, असे पाटील म्हणाले.

खर्गे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षाला म्हणावा तेवढा फायदा होणार नाही.वयानूसार ते जास्त दौरे करू शकत नाही. पक्षात त्यांचा फार प्रभाव देखील नाही. त्यामुळे ते केवळ बुजगावण्याप्रमाणे अध्यक्षपद सांभाळतील, असा टोला पाटील यांनी लगावला.खर्गे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सोनिया आणि राहूल गांधी कारभार हाकतील. वाढती महागाई, बेरोजगारी तसेच इतर समस्यांनी जनता त्रस्त आहे.अशात भाजपचा पर्याय ते शोधत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाकडे आयती संधी चालून आली आहे. पंरतु, देशवासियांना कॉंग्रेसकडे आकर्षित करण्याचे गुण नेतृत्वाकडे नाहीत.त्यामुळे केवळ समस्यांना प्राधान्य देत मतदार एक पर्याय म्हणून कॉंग्रेसकडे वळतील पक्षनेतृत्वामुळे नाही.

 

भाजपने देखील चांगली प्रशासकीय कामे केली पाहिजे.महागाईवर आळा घातला पाहिजे. शिवाय ज्या राज्यांमध्ये भाजपव्यतिरिक्त इतर पक्षाचे सरकार आहे त्या राज्यांमध्ये ईडी, सीबीआय आणि एनआयएचा राजकारणी वापर टाळला पाहिजे.या संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी भाजप करीत आहे,हे लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे भाजप विरोधात बोलणार्या लोकांना, नेत्यांना तुरूंगात टाकणे चुकीचे आहे. केंद्रातील तसेच विविध राज्यातील भाजप सरकारने चांगले कामे केली आहेत.ती जनतेपर्यंत घेवून जाण्याचे काम भाजपने केले पाहिजे,असे आवाहन देखील पाटील यांनी यानिमित्ताने केले.