लसीचा दुसरा डोस न घेतलेल्या व्यक्तींसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबवा – जिल्हाधिकारी संदीप कदम

लसीचा दुसरा डोस न घेतलेल्या व्यक्तींसाठी

लसीकरणाची विशेष मोहिम राबवा –  जिल्हाधिकारी संदीप कदम

·        गावनिहाय आकडेवारी गोळा करा

·        प्रत्येकाला संपर्क करा

भंडारा, दि.12:- कोविड लसीचा पहिला डोस घेतला मात्र दुसरा डोस अद्याप घेतला नाही अशा नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज लसीकरण व आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, कार्यक्रम अधिकारी   डॉ. माधुरी माथूरकर व अधिकारी उपस्थित होते.

            जिल्ह्याला सर्व वयोगटातील 7 लाख 28 हजार 244 लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट असून 12 जुलैपर्यंत  3 लाख 46 हजार 475 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला तर 01 लाख 15 हजार 152 लाभार्थ्यांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या 53 हजार 770 लाभार्थ्यांनी अद्याप दुसरा डोस घेतला नसल्याचे आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिले.

            ज्या पात्र लाभार्थ्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे अशा व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतू पात्र असूनही दुसरा डोस त्यांनी घेतला नाही. दुसरा डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी असून या सगळ्या व्यक्तींना प्राधान्याने लस देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे 2 लाख 72 हजार 800 व कोव्हॅक्सीन लसीचे 2 लाख 8 हजार 750 असे एकूण 4 लाख 81 हजार 550 डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कोविशिल्ड लसीचे 2 लाख 63 हजार 300 व कोव्हॅक्सीन लसीचे 2 लाख 250 डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. आज घडीला कोविशिल्ड लसीचे 9 हजार 500 व कोव्हॅक्सीन लसीचे 8 हजार 500 असे एकुण 18 हजार डोस उपलब्ध आहेत.

            कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेले 5 हजार 292 व कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेले 48 हजार 478 असे एकूण 53 हजार 770 लाभार्थी दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही त्यांनी लस घेतली नाही. अशा व्यक्तींची गावनिहाय आकडेवारी गोळा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. अशा प्रत्येक लाभार्थ्यांना संपर्क साधून लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे, असे ते म्हणाले. विशेष लसीकरण अभियान लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

            नियमित लसीकरण, अतिसार नियंत्रण पंधरवाडा, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जिल्हा गुणवत्ता व प्रसवपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंध या विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.