जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज व नोंदणी केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द

जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज व नोंदणी केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द

भंडारा, दि. 21 : जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना, कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद भंडारा कार्यालयास अर्ज केलेल्या उमेदवारांनी उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रे, प्रमाणपत्र व इतर माहितीच्या आधारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यासाठी नोंदणी रजिष्टरवर नोंदणी केलेली आहे. अशा प्राप्त अर्जांची तपासणी करुन यादी तयार करण्यात आलेली असून यादी bhandara.gov.in व bhandarazp.org या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी कळविले आहे.