अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी मोफत शिधावस्तुंचे वितरण

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी मोफत शिधावस्तुंचे वितरण

भंडारा, दि. 19: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना चे शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.

 

ऑक्टोंबर 2022 मध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्त्तीला 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ शिधावस्तुचे मोफत वितरण उपलब्ध करण्यात येईल.

नोव्हेंबर 2022 मध्ये प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ व अंत्योदय शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका धारकांना 5 किलो गहु, 30 किलो तांदुळ व 1 किलो साखर प्रति शिधापत्रिका धारकाला मिळणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी कळविले आहे.