नवीन अभ्यासक्रम तथा तुकडी सुरू करण्याचे वेळापत्रक जाहिर / जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाकडे 29 फेब्रुवारीपर्यत अर्ज करावे

नवीन अभ्यासक्रम तथा तुकडी सुरू करण्याचे वेळापत्रक जाहिर / जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाकडे 29 फेब्रुवारीपर्यत अर्ज करावे

            भंडारा दि.9 : राष्ट्रीय कौशल्य अर्हता आराखडा यानुसार कौशल्य,व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आणि उद्योजकता शिक्षण व महाराष्ट्र राज्यातील कौशल्य पाठक्रम यांच्याशी संबधित असणाऱ्या अभ्यासक्रमाबाबततीत प्रशिक्षण सत्र 2024-25 साठी संस्था मान्यता  वेळापत्रक मंडळाचे अभ्याक्रम राबविण्यासाठी नविन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम तुकडी सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

            नवीन संस्था व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम तुकडी सुरु करण्याकरिता संबधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे 29 फेब्रुवारी,2024 रोजी अर्ज सादर करावा.          जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयानी संस्थाकडून प्राप्त प्रस्तावाची तपासणी व प्रत्यक्ष निरिक्षण करुन संस्थांच्या मूळ प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल संबंधित प्रादेशिक कार्यालयास 15 मार्च,2024 रोजी अर्ज सादर करावे.

            तसेच प्रादेशिक कार्यालयानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावाची तपासणी करुन संस्थांच्या मूळ प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह 31 मार्च,2024 रोजी अहवाल मंडळास सादर करण्यात यावे.

        या मंडळाने प्रादेशिक कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावाची तपासणी करुन मान्यता प्रस्ताव 15 एप्रिल,2024 पर्यत शासनास सादर करणार आहे.त्यामुळे अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,परिसर,टाकळी,वरठी रोड,भंडारा येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,व्हि.एम.लाकडे यांनी कळविले आहे.