कृषी रथाला हिरवी झंडी दाखवून प्रधानमंत्री पिक विमा चित्ररथाचा शुभारंभ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचारासाठी जिल्हयात कृषी रथाला

हिरवी झंडी दाखवून प्रधानमंत्री पिक विमा चित्ररथाचा शुभारंभ

गडचिरोली, दि.19: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये राबवण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना शासन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर पिक विमा हा 1 रु मध्ये भरायचा असुन सर्व शेतकरी अर्जदारानी योजनेत सहभाग घ्यावा असे आवाह जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी केले. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. सदर योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी दि. 18 ते 31 जुलै या कालावधीत हा रथ प्रत्येक गावामध्ये जाऊन पिक विम्याचा प्रचार करणार आहे. जिल्हास्तरावरील विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक व कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी विमा योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरुन अधिसुचित ठिकाणचे घटकांचा प्रतिकुल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळू शकणार आहेत. सदर रथाला मंगळवारला जिल्हास्तरावर हिरवी झंडी दाखवून व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन बसवराज मास्तोळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आबासाहेब धापटे (कृषी उपसंचालक) व शितल खोबरागडे तंत्र अधिकारी(सांख्यिकी) गडचिरोली यांनी केले आहे. या प्रसंगी प्रमोद आंबोरकर कृषी पर्यवेक्षक, कुंदा कुमरे कृषी पर्यवेक्षक, वर्षा कुमरे, कृषी सहाय्य्क, लक्ष्मी आलेवार कृषी सहाय्य्क, अनुप भोयर, विश्वानंद पूनमवार तसेच पिक विमा कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक उज्व्ल राऊत, अनुप वऱ्हेकर जिल्हा समन्वयक, राहुल नंदनवार तालुका समन्वयक आदी उपस्थित होते.

सोबत जिल्हा स्तरावरील प्रतिनिधी आणि तालुका स्तरावरील पिक विमा प्रतिनिधी यांचे नाव व संपर्क क्र.देण्यात येत आहे.

अ.क्र. तालुका पिक विमा प्रतिनिधीचे नाव संपर्क क्रमांक पदनाम

१. गडचिरोली उज्वल अरुणराव राउत ९०९६९०६०२५ जिल्हा शाखा व्यवस्थापक

२. गडचिरोली अनुप अशोकराव व-हेकर ९७६६४०४०६२ जिल्हा प्रतिनिधी

३. गडचिरोली राहुल अरुण नंदनवार ९४०४४६४८८६ तालुका प्रतिनिधी

४. अहेरी पंकज विजय नौनुरवार ९४२१९९०३४६ तालुका प्रतिनिधी

५. आरमोरी विशाल वसंत सपाटे ८२७५६७७९३८ तालुका प्रतिनिधी

६. भामरागड सुरज वामनराव राउत ९५४५३८८२८० तालुका प्रतिनिधी

७. चामोर्शी महेश मारोती सत्तरवार ९६५७०५२४६४ तालुका प्रतिनिधी

८. चामोर्शी संतोष श्रावण नयमकर ९७६५६२९८२९ तालुका प्रतिनिधी

९. वडसा विशाल बिसन कुंभलकर ९५७९४०६४६४ तालुका प्रतिनिधी

१०. धानोरा निलेश अनिल वासेकर ८३९०२७६६३३ तालुका प्रतिनिधी

११. एटापल्ली गणेश प्रकाश गोन्धरलकर ७९७२६१३१७४ तालुका प्रतिनिधी

१२. कोरची विकेश चरणदास उंदीरवाडे ९४०४२३१८०९ तालुका प्रतिनिधी

१३. कुरखेडा अविनाश दादाजी भाणारे ८२७५२२८२९६ तालुका प्रतिनिधी

१४. मुलचेरा राजेश शंकर गुंटीवार ७५८८९५८८६९ तालुका प्रतिनिधी

१५. सिरोंचा रविंद्र रामय्या नासानी ९४९०४८३१४५ तालुका प्रतिनिधी