सोयाबीन पिकावरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी(स्पोडोप्टेरा) या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

सोयाबीन पिकावरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी(स्पोडोप्टेरा) या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

गडचिरोली,दि.08: सध्यस्थितीत सोयाबिन पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी प्रादुर्भाव दिसुन येत आहे याकिडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे फार गरजेचे आहे.

तंबाखूवरील पाने खाणारी अळी: प्रादुर्भावाची वेळ : या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते आक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसूनयेतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळ्यापानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेरपडतात ज्यामुळे त्या दिसत नाहीत.

प्रादुर्भावाची लक्षणे: अंडयातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळ्या समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु पानास छिद्र पाडत नाहीत त्यामुळे असे पान पातळ पांढ-या कागदासारखे दिसते. मोठ्या झाल्यानंतर अळ्यासर्व शेतात पसरतात व पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळ्याफुलेसुध्दा खातात.

व्यवस्थापन:सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे, पीक तणमुक्त ठेवावे,तंबाखुची पाने खाणारी अळी एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातील एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून नष्ट करावीत,भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात8 ते 10 प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत,5 टक्के निंबोळी अर्क 50 मिली 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी, अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. 500 एल.ई. विषाणु 2 मि.ली. प्रति लिटर पाणी किंवानोमुरीया रिलाई या उपयुक्त बुरशीचा 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, तंबाखूवरील पाने खाणान्या अळ्याच्या सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रती हेक्टरी लावावेत व निरिक्षणकरावे, आर्थिक नुकसान पातळी: 10 अळ्या/मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच पुढील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

किड,- कीटकनाशके- प्रमाण प्रति 10 लि. पाणी:- तंबाखूवरील पाने खाणारी अळी- फ्लुबेंडामाईड 39.35 एससी, 3 मिली, इमामेक्टिन बेन्झोएट 1.90 ईसी प्रति 4 ग्रॅम, 8.5 मिली, टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी,5 मिली, स्पायनोटोरम 11.7 एससी, 9 मिली, इंडोक्झाकार्ब 15.80 ईसी, 6.7 मिली, नोवॅल्युरोन 5.25 अधिक इंडोक्झाकार्ब 4.50 एससी, 16.5 मिली,

नोट : वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणी साठी शुद्ध पाणी वापरावे. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा जेणेकरून विषबाधा होणार नाही. असे तांत्रिक माहिती व सहकार्य: व.ना.म.कृ.वि. परभणी यांनी कळविले आहे.