गडचिरोली पोलीस दलातील ९३९ पोलीस अंमलदार यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मिळाली पदोन्नती

गडचिरोली पोलीस दलातील ९३९ पोलीस अंमलदार यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मिळाली पदोन्नती

सोबतच मा. जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक यांचे हस्ते ८७ होमगार्ड जवानांना स्वातंत्र्य दिनी पदोन्नतीची भेट

गडचिरोली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस नाईक पदी कार्यरत असलेल्या ५५४ पोलीस अंमलदारांना नुकतेच पोलीस हवालदार या पदावर तर पोलीस हवालदार पदी कार्यरत असलेल्या ३८५ पोलीस अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर पदोन्नती मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी पदोन्नती प्राप्त सर्व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. पदोन्नती प्राप्त सर्व पोलीस अंमलदार आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना पदोन्नती बहाल करण्यात आलेली आहे. सदर पोलीस अंमलदारांनी गडचिरोली पोलीस दलात रुजु झाल्यापासुन आतापर्यंत दिलेल्या सेवेबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी कौतुक केले असुन येणाऱ्या काळात त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच होमगार्ड मुख्यालय, मुंबई चे मा. महासमादेशक यांचे आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्याचे मा. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी मागील दहा वर्षापासून थांबुन असलेली जवानांची पदोन्नती सरांच्या हस्ते दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी ८७ होमगार्ड जवानांची पदोन्नती करुन १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी एक मोठी भेट म्हणुन दिलेली आहे. तसेच ०७ वरीष्ठ अधिका-यांचे पदोन्नतीचे प्रस्ताव मुंबई येथे मंजुरी करीता पाठविण्यात आलेले आहे. सध्या होमगार्ड संघटनेत आनंदाचे वातरवरण निर्माण झाले असुन पोलीसांच्या खांद्याला खांदा लावुन तुटपंज्या मानधनावर काम करणाऱ्या होमगार्डच्या जवानांना पदोन्नती देवुन मा. कुमार चिंता यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोलाची भेट दिलेली आहे.