जिल्ह्यात “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान” यशस्वी करा – संदीप कदम

जिल्ह्यात “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान” यशस्वी करा – संदीप कदम

भंडारा, दि. 8 : जिल्ह्यात “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान” यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान दिनांक 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी यांचे दालनात घेण्यात आली. सभेला जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन उपस्थित होते. तसेच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. डी. के.सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हितेश तायडे, आरोग्य सभापती जि. प. भंडारा राजु पारधी तसेच क्षयरोग व कुष्ठरोग विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्हयातील क्षयरोगाचे निदान होण्यापासून अद्यापही वंचित असणाऱ्या सर्व क्षयरुग्णांचा शोध घेवुन, त्यांना क्षयरोगाच्या औषधोपचारावर आणण्याचा आहे. मोहीमे अंतर्गत आरोग्य कर्मचारी एएनएम, एमपीडब्ल्यु, एचए, आशा वर्कर यांचेमार्फत प्रत्यक्ष गृहभेट देवुन क्षयरोगाबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. क्षयरोगाची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांचे दोन थुकी नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत तपासणी व निदानाकरीता पाठविण्यात येतील. त्याचप्रमाणे छातीचा एक्सरे काढण्याकरीता सुध्दा जवळच्या आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येणार आहे. ह्या दोन्ही चाचण्यामध्ये क्षयरुग्ण अदुषित आहे परंतु क्षयरोगाची लक्षणे दिसून आल्यास अत्याधुनिक CBNAAT तसेच TruNaat मशिनवर थुकी नमुने तपासण्याची सेवा मोफत उपलब्ध आहे. क्षयरोगावरील निदान, चाचण्या, एक्सरे, औषधोपचार, आरोग्य शिक्षण सर्व शासकीय आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहेत.

अधिक माहितीकरीता- जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परीसर, भंडारा. टोल फ्री क्र. 1800116666 वर संपर्क करावा.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनान्वये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे आहे. त्याकरीता समाजातील क्षयरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून काढुन त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे. या अभियानावर वेळोवेळी प्रा. आ. कें., तालुका व जिल्हास्तरावरुन पर्यवेक्षकीय अधिकारी व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचेमार्फत सुक्ष्म पर्यवेक्षण करण्यात येणार आहे.