माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीचे प्रशिक्षण संपन्न 

माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीचे प्रशिक्षण संपन्न 

              भंडारा दिनांक, 13 : आगामी  लोकसभा निवडणुकांमध्ये माध्यमांसाठी गठीत माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समिती (एमसीएमसी )तसेच पेड न्यूज समितीचे कार्य याबाबतीचे सविस्तर प्रशिक्षण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आले .

          या प्रशिक्षण क्षेत्रात उपजिल्हाधिकारी तथा नोडल ऑफिसर प्रशिक्षण लीना फलके यांनी माध्यम प्रमाणीकरण समितीच्या बाबतीतील भारत निवडणूक आयोगाच्या असलेल्या सूचनांचे तसेच पेड न्यूज व पेड न्यूज वरील करावयाची कार्यवाही याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

          जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी देखील प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमांबाबत आयोगाकडून आलेल्या सूचनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 दरम्यान आगामी निवडणुकांच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे व त्यांचे प्रशिक्षण वेळोवेळी करण्यात येत आहे.