पात्र नागरिकांनी नि:शुल्क बुस्टर डोस घ्यावा जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

पात्र नागरिकांनी नि:शुल्क बुस्टर डोस घ्यावा जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

भंडारा, दि. 29 : केंद्र सरकारने 15 जुलै ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत कोविड लसीकरण अमृत महोत्सवा अंतर्गत एकुण 75 दिवस सर्व शासकिय कोविड लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील सर्व नागरिकांना बूस्टर (प्रिकॉशन) डोस मोफत देण्यास परवानगी दिली असुन, आता नि:शुल्क बुस्टर डोससाठी 33 दिवसांचा कालावधी शिल्लक असुन त्यानंतर मात्र बुस्टर (प्रिकॉशन) डोससाठी पैसे मोजावे लागणार आहे. तरी पात्र नागरिकांनी निशुल्क बुस्टर डोस घ्यावा असे, आरोग्य विभागाने कळविले.

जिल्हयात सुमारे 1976690 लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट असुन, आतापर्यंत पहिला डोस 991531 टक्के, दुसराडोस 884441 टक्के तर बुस्टर (प्रिकॉशन) डोस 100718 टक्के नागरिकांनी घेतलेला आहे. 15 जुलै 2022 पासुन नि:शुल्क बुस्टर (प्रिकॉशन) डोस लसीकरण सुरु असुन 43 दिवस झाले.

तरी सुध्दा नागरिकांमध्ये बुस्टर डोस घेण्यास उदासीनता दिसून येते. तरी देखील पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेण्यासाठी पुढे यावे. आरोग्य विभागा मार्फत आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या एकत्रित जनजागृतीने जिल्हयात कोविड लसीकरण मोहिम अविरतपणे सुरु आहे.

जिल्हयात सर्व वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून गावोगावी लसीकरण केंद्र निर्माण केले जात असुन, शासकिय, निमशासकिय कार्यालये, संस्था, शाळा-महाविद्यालय, कर्मचारी व नागरिकांकरीता लसीकरण शिबिरे आयोजीत केली जात आहे. आता 15 जुलै ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत कोविड लसीकरण अमृत महोत्सवाअंतर्गत एकुण 75 दिवस सर्व शासकिय कोविड लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वयोगटातील नागरिकांनाही मोफत बुस्टर डोस मिळणार आहे. त्यानंतर मात्र कोविड बुस्टर डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तरी सर्व पात्र लाभार्थींनी आपले कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुवर यांनी केले आहे.