शेतकरी आत्महत्येची 23 प्रकरणे मदतीकरीता निकाली Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

शेतकरी आत्महत्येची 23 प्रकरणे मदतीकरीता निकाली Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 14 जुन : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 27 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 23 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, तर उर्वरित 1 प्रकरण फेरतपासणीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तहसीलदार(सामान्य) यशवंत धाईत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, पोलिस उपनिरीक्षक आर. के.मेंढे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.जी.एम. मेश्राम, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी शंकर लोडे, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 27 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 23 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. उर्वरित 1 प्रकरणे समितीने फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवले आहे.