सिंदेवाही शहराच्या मुख्य महामार्गाची चार दिवसांत डागडुजी करा अन्यथा जनआंदोलन करू भाजपाचा ईशारा

सिंदेवाही शहराच्या मुख्य महामार्गाची चार दिवसांत डागडुजी करा अन्यथा जनआंदोलन करू भाजपाचा ईशारा

रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे अपघात झाली वाढ…

होत असलेल्या मानसिक त्रासाला व अपघाताला सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही जबाबदार…

सिंदेवाही – चंद्रपूर-नागपुर राष्ट्रीय महामार्ग सिंदेवाही शहरातुन गेलेले आहे , तसेच सिंदेवाही हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते तसेच लोकांची ये – जा सुध्या मोठ्या प्रमाणात असते , पण याच मुख्य महामार्गावर अनेक दिवसांपासून जागोजागी खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

15 ऑगस्ट ला भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला पण याचवेळी त्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेकडो शाळकरी विध्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे , या खड्डयांमुळे रोज अपघात घडत आहेत कित्येक नागरिकांचा जीव जात आहे आणि या अपघातांना सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार आहे असे खळसावत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही आणि प्रतिलीपी मा. तहसीलदार सिंदेवाही यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या खड्डयांची दुरुस्ती येत्या 4 दिवसात करण्यात आली नाही तर मोठे जनआंदोलन उभारणार असे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले. निवेदन देतेवेळी नागराज गेडाम माजी सभापती समाजकल्याण जी. प. चंद्रपूर , आशिष चिंतलवार , अरविंद देवतळे , जावेद पठाण , पुणेश गांडलेवार , प्रतिष वैकुंठी , किशोरजी भरडकर नगरसेवक न.प.सिंदेवाही , प्रीतम नागोसे , देवा मंडलवार , प्रतीक जैस्वाल , वैभव मडावी , रोशन गेडाम , अंबर तिवारी तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.