लोकसभा 2024 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली प्रिंटरची सभा

लोकसभा 2024 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली प्रिंटरची सभा

        भंडारा, दि.17: काल 16 मार्चपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या लोकसभा 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रिंटिंग प्रेस मालकांची, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बैठक घेतली. निवडणुकीत उमेदवारांचे प्रचार साहित्य प्रिंटिंग प्रेसमार्फत  छापल्या जातील. त्यादृष्टीने प्रिंटरनी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी स्थानिक प्रिंटर्सला सांगितले.

         आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ आणि तक्रार निवारण कक्ष नोडल अधिकारी  माणिक चव्हाण उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण मॅडम यांनी प्रिंटर्सला विहित नमुने भरून प्रशासनाला सादर करायचे त्याबाबत विस्तृत माहिती दिली.

        या नमुन्यांमध्ये प्रिंटरने छापलेल्या सर्व साहित्यांची  निवडणुकी विषय पोस्टर, पॉम्पलेट यांची सर्व माहिती आणि छापलेल्या प्रतींची संख्या, दिनांक यासोबत विहित नमुन्यात स्वाक्षरीसह हा नमुना भरून देण्यात यावा,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.