स्वराज्य महोत्सव उपक्रमातंर्गत येत्या 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सगळीकडे एकाच वेळी सकाळी 11 वाजता होणार समुह ‘राष्ट्रगीत’

स्वराज्य महोत्सव उपक्रमातंर्गत येत्या 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सगळीकडे एकाच वेळी सकाळी 11 वाजता होणार समुह ‘राष्ट्रगीत’

भंडारा, दि. 12 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले असून 8 ते 17 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व स्तरातून दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता शाळा, महाविद्यालय, संस्था, नागरिक यांच्या सहभागाने समुह राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणानी सर्वांपर्यंत ही माहिती पोहचवावी असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले. यासोबतच 14 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात जिल्हा स्तरीय मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमात चित्रप्रदर्शनी भरवायची असून त्यात स्वातंत्र्य काळातील घटना, त्याची माहिती त्यात अभिप्रेत आहे.

राष्ट्रगीत गायन याबाबत सर्व नागरिक, केंद्र शासन ,राज्य शासन संबंधित कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था शासकीय व निमशासकीय कार्यालय, ग्रामस्तरावर सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी अशा सर्वत्र समूहांनी मोकळे पटांगण वर्ग खोली किंवा हाल अशा ठिकाणी एकत्रित उपस्थित राहून सकाळी अकरा ते अकरा वाजून एक मिनिटपर्यंत या एकाच मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करावयाचे आहे.