सध्या पाऊस थांबला असला तरी खबरदारी म्हणुन महानगरपालिका शाळांमध्ये असलेल्या १३२० पूरग्रस्तांना शाळेतच थांबविण्यात आले आहे.  

सध्या पाऊस थांबला असला तरी खबरदारी म्हणुन महानगरपालिका शाळांमध्ये असलेल्या १३२० पूरग्रस्तांना शाळेतच थांबविण्यात आले आहे.

दरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत –

१. पुरग्रस्त परीसरात स्वच्छता केली जात आहे, ब्लीचिंग, नाली फवारणी, फॉगिंग केले जात आहे.

२. यांत्रिकी विभागामार्फत आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी टँकर पुरविले जात आहेत.

३. साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभागातर्फे सर्व पुरबाधितांची आरोग्य तपासणी केली जात आहे तसेच MPW ANM आणि आशा वर्कर मार्फत सर्वे करून

सार्वजनिक बोरिंग, विहिरी, खाजगी बोरिंग – विहिरी यात ब्लीचिंग पावडर टाकण्यात येत आहे.

४. ब्रीडिंग चेकर्स मार्फत सातत्याने पुरग्रस्त परिसरात तपासणी केली जात आहे.

५. बांधकाम विभागामार्फत नाली कवर व इतर धोकादायक खड्डे यांची तपासणी करून भरण टाकल्या जात आहे.