पवणाचक येथे केंद्रास्तरीय बालक्रीडा तथा सांस्कृतिक संमेलन संपन्न 

पवणाचक येथे केंद्रास्तरीय बालक्रीडा तथा सांस्कृतिक संमेलन संपन्न 

पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही बिटातील पवणाचक येथे तीन दिवसीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक संमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले

या संमेलनाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सदस्य मा राहुलभाऊ पोरेड्डी वार यांचे हस्ते पार पडले यावेळी मंचावर पवणाचक चे सरपंच दिवाकर शेंडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश सोनूले,विस्तार अधिकारी आवळे साहेब केंद्रप्रमुख परचाके साहेब,बंडूभाऊ चौधरी नानाजी शेंडे उपस्थित होते

रात्री बिटातील 14 शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले याचे उदघाटन सरपंच दिवाकर शेंडे यांनी केले या कार्यक्रमात 14 ही शाळांनी भाग घेतल्याने मोठी रंगत भरली होती सर्व गावकरी मंडळींनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला दुसऱ्या व तिसऱ्या दिवसी मुला मुलींचे सांघिक खेळ घेण्यात आले सतत 3 दिवस चाललेल्या या संमेलनाने गावात उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री डेहनकर सर ,स शिक्षक संग्रामे सर अध्यक्ष परचाके साहेब,कार्याध्यक्ष प्रशांत गोरलावर सर,उपाध्यक्ष कामडी सर,स शिक्षक उमाकांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला याकरिता सर्व ग्रामस्थानी मोलाचे सहकार्य केले